Nanded|नांदेडमध्ये वयोवृद्ध दाम्पत्याचे दागिने, पैसे घेऊन चोरट्यांचा पळ; सोनपेठ गावात दहशत

| Updated on: Dec 06, 2021 | 9:39 PM

कुपटी सोनपेठ गावात चोरट्यांनी धुमाकूळ घालत वयोवृद्ध दाम्पत्याजवळचे पैसे आणि दागिने पळवले आहेत. इस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुपटी सोनपेठ गावात चोरट्यांनी लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत ही चोरी केलीय.

नांदेड : कुपटी सोनपेठ गावात चोरट्यांनी धुमाकूळ घालत वयोवृद्ध दाम्पत्याजवळचे पैसे आणि दागिने पळवले आहेत. इस्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुपटी सोनपेठ गावात चोरट्यांनी लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्राचा धाक दाखवत ही चोरी केलीय. या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते, मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. दरम्यान, गावातील एका तरुणाने चोरट्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता चोरट्यांनी तरुणावर दगडफेक केलीय. या घटनेमुळे किनवट तालुक्यातील ग्रामीण भागात खळबळ उडाली असून चोरट्यांची दहशत पसरलीय.
Mumbai : जॅकलिनचा सुकेश चंद्रशेखरशी काय संबंध ?
Special Report | अहवाल येईपर्यत महाराष्ट्र एसटीविनाच धावणार का ?