‘अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत…’, कुणाची खोचक टीका?

| Updated on: Mar 29, 2024 | 2:53 PM

पुण्याच्या भोरमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान संवाद मेळाव्यात बोलताना घड्याळ चिन्हावरच्या बदललेल्या वेळेवरून, अजित पवार गटातील नेत्यांचा 420 गँग असा उल्लेख करत रोहित पवार यांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केलीय. पूर्वी घड्याळात 10 वाजून 10 मिनिट टाइम असायचा, आता...

पुण्याच्या भोरमध्ये शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार दौरा सुरू असताना शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. पुण्याच्या भोरमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान संवाद मेळाव्यात बोलताना घड्याळ चिन्हावरच्या बदललेल्या वेळेवरून, अजित पवार गटातील नेत्यांचा 420 गँग असा उल्लेख करत रोहित पवार यांनी अजित पवार गटावर जोरदार टीका केलीय. पूर्वी घड्याळात 10 वाजून 10 मिनिट टाइम असायचा, आता तो टाइम बदलून 4 वाजून 20 मिनिट झालाय. सुनील तटकरे साहेब म्हणतात, घड्याळ तेच पण वेळ नवी, 420 म्हणजे फ्रॉडचं कलम असतं. घड्याळ आणि चिन्ह चोरून भाजप सोबत गेलेली ही फ्रॉड 420 गँग फार काळ सत्तेत राहणार नाही, असं म्हणतं रोहित पवार यांनी अजित पवार गटावर सडकून टीका केली आहे.

Published on: Mar 29, 2024 02:45 PM
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार, सूत्रांची माहिती काय?