‘मला पैशांची मदत करा’, विधानसभेच्या तोंडावर भाजप उमेदवाराचं जनतेला आवाहन अन् रोहित पवारांची सडकून टीका

| Updated on: Nov 13, 2024 | 3:19 PM

भाजप आमदार राम शिंदे यांची एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. राम शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत नागरिकांसह मतदारांना विधानसभा निवडणूकीत आर्थिक मदतीच आवाहन केल्याचे पाहायला मिळत आहे. यावर ऱोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.

भारतीय जनचा पक्षाचे विधानपरिषद आमदार आणि माजी मंत्री आणि कर्जत जामखेडचे उमेदवार राम शिंदे यांची एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. राम शिंदे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत विधानसभा निवडणुकीत नागरिकांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले आहे. राम शिंदे यांच्या अवाहानानंतर सोशल मीडियावर राम शिंदे यांना चांगलेच ट्रोल केलं जात आहे. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आणि आमदार रोहित पवार यांनी देखील राम शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजपाने राम शिंदे यांना मोठा निधी दिलेला आहे एवढेच नव्हे तर अर्ज दाखल करतांना त्यांनी शपथपत्रावर 8 ते 10 कोटी रुपयाची मालमत्ता जाहीर केलेली आहे, असं असतांना हे आवाहन लोकांना भावनिक करण्यासाठी करण्यात आलं आहे. असे असले तरी लोक त्यांच्यावर हसताहेत त्यांनी आता नेत्यांना विकत घेणे, दारू वाटणे सुरु केलेले असतांना हे आवाहन हास्यस्पद असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे.

Published on: Nov 13, 2024 03:19 PM
Devendra Fadnavis Tweet : ‘जाऊ द्या, काही नेत्यांना तमाशा…’, बॅग तपासणीवरून भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला
‘उद्धव ठाकरेंच्या बॅगेतून दोनचं गोष्टी निघतील, फारफार तर…’; बॅग तपासणीवरून राज ठाकरेंचा खोचक टोला