कीड काढण्यासाठी सर्जरी कधी? पुणे पालिकेच्या अधिकाऱ्याच्या निलंबनावरून रोहित पवारांची टीका, थेट शिंदेंना सवाल

| Updated on: May 26, 2024 | 2:08 PM

आरोग्य विभागात ॲम्बुलन्स खरेदीत साडेसहा हजार कोटी रुपयांची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या 'खेकड्या'ने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरवात केलीय. नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील याच खेकड्याने निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडं केलीय.

पुणे पालिकेच्या निलंबित आरोग्य अधिकाऱ्याचं एक खळबळजनक पत्र व्हायरल होत आहे. या पत्रात पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मी नियमबाह्य काम करत नाही म्हणून माझं निलंबन करण्यात आलं असं म्हटलं आहे. भगवान पवारांच्या निलंबनावरून रोहित पवार यांनी टीका केली आहे. ‘खेकड्यानं अधिकाऱ्यांनाही नांग्या मारायला सुरुवात केली’, असं रोहित पवार यांनी म्हटलं असून त्यांचा तानाजी सावंत यांच्यावर निशाणा आहे. रोहित पवारांनी ट्वीट करत असे म्हटले की, आरोग्य विभागात ॲम्बुलन्स खरेदीत साडेसहा हजार कोटी रुपयांची दलाली खाणाऱ्या भ्रष्टाचाराच्या ‘खेकड्या’ने आता अधिकाऱ्यांनाही नांग्या मारण्यास सुरवात केलीय. नियमबाह्य टेंडरिंगला नकार दिल्यामुळे व्यवस्थेतील याच खेकड्याने निलंबित केल्याची तक्रार पुणे महापालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडं केलीय. नियमबाह्य टेंडरसाठी कात्रजच्या कार्यालयात बोलावून दबाव आणणारा हा मंत्री म्हणजे आरोग्यमंत्रीच आहे का? आणि असेल तर संपूर्ण आरोग्य खात्याला पोखरणाऱ्या या मंत्र्याला मुख्यमंत्री डॉ. एकनाथ शिंदे अजून किती दिवस पाठीशी घालणार? आरोग्य व्यवस्थेला लागलेली ही कीड काढण्यासाठी सर्जरी कधी करणार? असा सवाल केला आहे.

Published on: May 26, 2024 02:08 PM
संजय राऊत यांना खोटं बोलण्याचं व्यसन, ‘सामना’तून केलेल्या दाव्यावर भाजपचा पलटवार
हिंमत असेल तर एक ‘रोखठोक’ त्यावरही येऊ द्या…, चंद्रशेखर बावनकुळेंचं संजय राऊतांना चॅलेंज