विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राजीनामा देणार? भाकीत वर्तविणारे ज्योतिषी नेमकं कोण?
निकाल येण्यापूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राजीनामा देणार असल्याचं भाकित आमदार रोहित पवार यांनी दिलंय. रोहित पवार यांनी शिवसेनेच्या अपात्र आमदारांच्या प्रकरणावर गंभीर शंका व्यक्त केली आहे. निकाल देण्यापूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे राजीनामा देऊ शकतात, रोहित पवार यांचा दावा?
मुंबई, १४ डिसेंबर २०२३ : ३१ डिसेंबरपर्यंत शिवसेनेच्या अपात्रता प्रकरणावर निकाल येणार आहे. मात्र हा निकाल येण्यापूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राजीनामा देणार असल्याचं भाकित आमदार रोहित पवार यांनी दिलंय. रोहित पवार यांनी शिवसेनेच्या अपात्र आमदारांच्या प्रकरणावर गंभीर शंका व्यक्त केली आहे. निकाल देण्यापूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे राजीनामा देऊ शकतात, असं रोहित पवार यांना वाटतं. शिंदेच्या शिवसेनेच्या अपात्र अमदारांवरून सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू असताना नार्वेकरांनी रोज सुनावणी घेतली. मात्र निकाल देण्याआधी राहुल नार्वेकरच राजीनामा देतील आणि हे प्रकरण लांबवलं जाईल, असा दावा रोहित पवार यांनी केलाय. यावरून शिंदे गट आणि अजित पवार गटाने रोहित पवार यांना ज्योतिषी म्हटलंय.. बघा नेमकं कुणी काय केली टीका?