Video : ते तोडण्याचा प्रयत्न करतील, आम्ही जोडण्याचा प्रयत्न करू- रोहित पवार

| Updated on: Jun 21, 2022 | 12:50 PM

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आहे. एकनाथ शिंदे हे सध्या सुरतला असून, त्यांच्यासोबत शिवसेनेचे 35 आमदार असल्याचा दावा भाजपकडून (BJP) करण्यात येत आहे. यामुळे शिवसेनेच्या (shivsena) गोटात खळबळ माजली आहे. एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये जाणार असल्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यांशी संपर्क झाला […]

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आहे. एकनाथ शिंदे हे सध्या सुरतला असून, त्यांच्यासोबत शिवसेनेचे 35 आमदार असल्याचा दावा भाजपकडून (BJP) करण्यात येत आहे. यामुळे शिवसेनेच्या (shivsena) गोटात खळबळ माजली आहे. एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये जाणार असल्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यांशी संपर्क झाला असून, राज्यात राजकीय भूकंप वगैरे काही येणार नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. आता या सर्व प्रकारावर राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहीत पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. तो शिवसेनेचा अंतर्गत मामला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आम्ही जोडण्याचे काम करतो मात्र काही जण तोडण्याचे काम करतात असे म्हणत त्यांनी भाजपावर देखील निशाणा साधला आहे. आम्ही आमच्या नेत्यांच्या सोबत आहोत, ते जसे म्हणतील तसं करू असे रोहीत पवार यांनी म्हटले आहे.

Published on: Jun 21, 2022 12:50 PM
Video : एकनाथ शिंदेंची नाराजी, दिल्लीसह मुंबईत बैठकींचं सत्र
Bhai Jagtap | काँग्रेसच्या सर्व नेत्यांशी आमचा संपर्क : भाई जगताप