zomato बॅायला 10 मिनीटात delivery द्यायला लावण धोक्याचं, रोहित पवारांचा नव्या निर्णयाला विरोध
आमदार रोहित पवारांनी हाच मुद्दा उपस्थित करत याला विरोध दर्शवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात या घोषणेचे भवितव्य काय असणार? हे अजून स्पष्ट झाले नाही. सरकार आता यावर काय निर्णय घेतंय याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई : फूड डिलिव्हरी अॅप झोमॅटोने (zomato) सोमवारी त्याचा नवीन निर्णय जाहीर केला आहे. त्यात 10 मिनीटात फूड डिलीव्हरी (Food delivery) होईल असे सांगण्यात आलंय. झोमॅटोचे सह-संस्थापक दीपंदर गोयल यांनी ट्विटरवर ही घोषणा केली, ते म्हणाले की ते पुढील महिन्यात गुडगावमध्ये प्रथम ही योजना लॉन्च होईल. सध्या 30 मिनीटांचा डिलीव्हरी वेळ असल्याने ही प्रोसेस स्लो झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. गेल्या वर्षी झोमॅटो-समर्थित ब्लिंकिट (तेव्हा ग्रोफर्स म्हणून ओळखले जाणारे) 10-मिनिटांत किराणा पोहोचवण्याच्या घोषणेनंतर आता फूड डिलीवरीसंधी हा मोठा निर्णय घेण्यात आलाय. आमदार राहित पवार यांनी तरूणांच्या सुरक्षेवरून या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. झटपट डिलीव्हरीच्या नादात तरूणांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो असे रोहित पवारांचे म्हणणे आहे. तसेच याबाबत आम्ही परिवहन मंत्र्यांशी चर्चा करणार आहे. हा मुद्दा पुढेही लावून धरू आणि या तरूणांना जीव धोक्यात घालू देणार नाही, अशी प्रतिक्रिया रोहीत पवारांनी दिली आहे. त्यामुळे या निर्णयाला महाराष्ट्रातून तरी विरोध होताना दिसतोय. झटपट डिलीव्हरीच्या नादात अपघात घडण्याची भिती रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.