नरेश म्हस्के यांनी आपली राजकीय उंची पाहून बोलावं, राष्ट्रवादीच्या नेत्यानं सुनावलं
VIDEO | नरेश म्हस्के यांना क्रिकेट आणि पवार कुटुंबीय कधीच कळणार नाही, राष्ट्रवादीच्या नेत्याचा हल्लाबोल
पुणे : ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरलेले रोहित पवारांविरोधात अजित पवार यांनीच षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केलाय. गुरुवारी ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना पवार कुटुंबातच मतभेद असल्याचा दावा केला. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नरेश म्हस्के यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. ‘नरेश म्हस्के यांना ओळखत नाही, भेटलो नाही त्याच्याबद्दल ऐकले आहे की ठाणे नगराध्यक्ष कसे झाले ते इतर पक्षात जाणार होते. उद्धव ठाकरे यांनी त्यांना नगराध्यक्ष बनवलं, ते काँग्रेसमध्ये जाणार होते. मात्र ते त्यांच्यावर आता टीका करताना दिसताय.’, असे रोहित पवार म्हणाले. तर नरेश म्हस्के यांनी आपली राजकीय उंची बघून बोलावे, त्यांना क्रिकेट आणि पवार कुटुंब कधीच कळणार नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी नरेश म्हस्के यांना खोचक टोलाही लगावला.