Rohit Pawar | केंद्रीय पथकाने सुद्धा नुकसानग्रस्त भागाची तात्काळ मदत जाहीर करावी

| Updated on: Oct 06, 2021 | 8:17 PM

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी आघाडी, युतीच्या आकडेवारीत आघाडीने सरशी घेतली असं विधान रोहित यांनी केलं असून यावेळी बोलताना त्यांनी केंद्राने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी असंही म्हटलं आहे.

राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी आघाडी, युतीच्या आकडेवारीत आघाडीने सरशी घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यापुढे सर्वच निवडणुकीत मतदारसंघाचा अभ्यास करून आघाडीचा प्रयोग राबवला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

तसंच पुढे बोलताना त्यांनी मराठवाडा आणि विदर्भातील अतिवृष्टीवरही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळायला हवी. केंद्राच्या पथकानेही या भागात तात्काळ पाहणी करून मदत जाहीर करावी. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे, कोणतीही अट न टाकता मदत द्यायला हवी, त्यासाठी राज्य सरकार मदत करेलच, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 PM | 6 October 2021
Bacchu Kadu | चुलीत गेलं मंत्रीपद, उद्या राजीनामा फेकतो, मिटकरींच्या आरोपांवर बच्चू कडू कडाडले