‘प्रत्येक घरात दिवाळी फराळासह 3 हजारांचं पाकीट दिलं’, संजयकाका पाटलांच्या गंभीर आरोपावर आर. आर. आबांचा मुलगा म्हणाला…

| Updated on: Nov 04, 2024 | 11:51 AM

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी रोहित पाटील यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. या गंभीर आरोपांनंतर रोहित पाटील यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली. बघा नेमकं काय म्हणाले?

विधानसभा निवडणुकीची राज्यात धामधूम सुरू असताना सांगलीतील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. रोहित पाटील यांच्याकडून दिवाळी फराळ आणि तीन हजार रुपये वाटले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी रोहित पाटील यांच्यावर हा पैसे वाटल्याचा गंभीर आरोप केला आहे. संजयकाका पाटील यांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांनंतर आणि चौकशी करण्यात आल्यानंतर रोहित पाटील यांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिली. हे असे आरोप मला बदनाम करण्यासाठी केले जात आहेत. विनाकारण माझं नाव या प्रकरणात घेतलं जात आहे. ज्यापद्धतीने त्या व्यक्तीला चारचाकी गाडीत बसवलं गेलं होतं. त्याच्यावर दडपण टाकलं गेलं होतं. माझं नाव घेण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकला गेला होता. हे स्पष्टपणे व्हिडीओमध्ये दिसत आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. मी देखील पोलिसांना विनंती केलेली आहे की, या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी व्हावी, असं रोहित पाटील म्हणालेत.

Published on: Nov 04, 2024 11:50 AM
‘… तेव्हाच मी माघार घेणार’, सदा सरवणकरांची मनसेला अट, तर माहिममध्ये महायुतीच्या ‘नवाब मलिक’ पॅटर्नची चर्चा
मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार; म्हणाले, ‘…निवडणूक लढणं शक्य नाही’