‘… तेव्हाच मी माघार घेणार’, सदा सरवणकरांची मनसेला अट, तर माहिममध्ये महायुतीच्या ‘नवाब मलिक’ पॅटर्नची चर्चा

| Updated on: Nov 04, 2024 | 11:17 AM

माहिम मतदारसंघात पुन्हा नवाब मलिक पॅटर्नची जोरदार चर्चा आहे. कारण आम्ही अमित ठाकरेंचा प्रचार करू, अशी भूमिका भाजपच्या प्रसाद लाड यांनी मांडली आहे. दुसरीकडे मनसेने जर महायुती विरोधातील उमेदवार मागे घेतले तर मीही उमेदवारी मागे घेईल, असे सदा सरवणकर म्हणालेत

माहिमच्या जागेवरून भाजपने अप्रत्यक्षपणे भाजपने शिंदे गटाला इशारा देत राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांचा प्रचार करण्याची भूमिका घेतली आहे. दुसरीकडे राज ठाकरेंनी महायुतीविरोधातील उमेदवार मागे घेतले तर मी माझा अर्ज मागे घेण्यास तयार आहे, अशी अट शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांनी घातली आहे. सदा सरवणकर यांनी राज ठाकरेंसमोर अट ठेवताना एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करायचं असल्याचा उल्लेख केलाय. तीन दिवसांपूर्वीच निकालानंतर मनसेच्या मदतीने भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि मनसे सत्तेत असेल असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. तर मनसे आणि भाजप सत्तेत येऊन एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं काय होतं ते निकालानंतर पाहू? असा दावा अमित ठाकरेंनी केला होता. त्याच पार्श्वभूमीवर सदा सरवणकरांचं वक्तव्य महत्त्वाचं मानलं जात आहे. अशातच माहिम मतदारसंघात पुन्हा एकदा नवाब मलिक पॅटर्नची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Nov 04, 2024 11:17 AM
‘मर्दाची औलाद असते तर…’, जितेंद्र आव्हाडांची अजित पवारांसंदर्भात बोलताना जीभ घसरली
‘प्रत्येक घरात दिवाळी फराळासह 3 हजारांचं पाकीट दिलं’, संजयकाका पाटलांच्या गंभीर आरोपावर आर. आर. आबांचा मुलगा म्हणाला…