Pune | लोणावळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्वागतासाठी 300 किलोंचा हार
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार याचं लोणावळा येथे जंगी स्वागत करण्यात आलं आहे. यावेळी त्यांना तब्बल 300 किलोंचा फुलांचा हार घालण्यात आला.
महाराष्ट्र राज्यांचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच लोणावळा येथे जंगी स्वागत करण्यात आलं आहे. काही विकास कामांच्या उद्घाटनासाठी अजित पवार हे लोणावळा येथे आले होते. यावेळी लोणावळ्याच्या छ. शिवाजी महाराज चौैकात त्यांच जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी त्यांच्यासाठी तब्बल 300 किलो वजनाचा हार कार्यकर्त्यांनी आणला होता.