गोपीचंद पडळकर यांना कुणी डिवचले? एसटी कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा कधी आंदोलन करणार? विचारला सवाल
VIDEO | एसटी कर्मचाऱ्यांसाठी गोपीचंद पडळकर कर्मचाऱ्यांचे मसीहा बनून आझाद मैदान येथे कधी झोपून आंदोलन करणार?
सांगली – महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार होतं, त्यावेळेस भाजपा आमदार गोपीचंद पडळकर हे एसटी कामगारांच्या मागण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे मसीहा बनून आझाद मैदान येथे आंदोलन करताना दिसले होते. परंतु आता राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार असतानाही आजपर्यंत राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना पगार वाढ किंवा त्याचा पगार सुद्धा मिळालेला नाही, असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी म्हटले आहे. तर सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथील एसटी चालक भीमराव सूर्यवंशी यांनी आत्महत्या केल्याचे समजत आहे, मग आता भाजप आमदार जे स्वतःला एसटी कर्मचाऱ्यांचे मसीहा समजत होते, मग तेच मसीहा आता एसटी कर्मचाऱ्यांना त्वरित पगार मिळावा म्हणून आझाद मैदानात झोपून कधी आंदोलन करणार हे जाहीर करावं, असा सवाल गोपीचंद पडळकरांना विचारला आहे.
Published on: Feb 16, 2023 09:41 PM