रामदास कदम हे गोळवलकर आणि हेडगेवार यांच्या विचारांचे गुलाम, कुणी केली सडकून टीका?
VIDEO | अजित पवार यांच्या विषयी बोलताना औकातीत राहून बोला, कुणी दिला रामदास कदम यांना इशारा
रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांनी काल खेड तालुक्यामध्ये सभा घेतली. या सभेला प्रचंड गर्दी होती. यामुळे रामदास कदम यांच्या पोटात दुखू लागल्यामुळे आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली. परंतु या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अजित पवार यांच्यावर खोटे आरोप केल्याचे दिसत आहे. रामदास कदम तुम्ही गोळवलकर आणि हेडगेवार यांच्या विचाराचे गुलाम झाले आहात, असे म्हणत टीका केली आहे. आरपीआय राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केली आहे. तर अजित पवार रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे पाईक आहेत आणि रामदास कदम तुम्हाला खेड तालुक्याचे नेता अजूनपर्यंत बनता आले नाही. अजित पवार हे राज्याचे लोकप्रिय नेते आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना औकातीत राहून बोला असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) यांच्याकडून करण्यात आले आहे.
Published on: Mar 06, 2023 04:30 PM