140 कोटी जनता मोदींची फॅन, या निवडणुकीत लावणार… रामदास आठवलेंची शेरोशायरीतून फटकेबाजी

| Updated on: Apr 08, 2024 | 10:04 PM

चंद्रपूरमध्ये आयोजित महायुतीच्या सभेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या अनोख्या शैलीत मंचावरील नेते मंडळींचे मन जिंकून घेतले. यावेळी रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाद्वारे शेरोशायरीतून जोरदार फटकेबाजी केली. बघा काय म्हणाले रामदास आठवले?

चंद्रपूरमध्ये आयोजित महायुतीच्या सभेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या अनोख्या शैलीत मंचावरील नेते मंडळींचे मन जिंकून घेतले. यावेळी रामदास आठवले यांनी आपल्या भाषणाद्वारे शेरोशायरीतून जोरदार फटकेबाजी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंक सक्रिय राजकारणी आहेत. अत्यंत शक्तीशाली राजकारणी आहेत. या महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीला मजबूत करण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. महाराष्ट्रातील महायुती मजबूत करण्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा फारच मोठा आहे वाटा, कारण त्यांनी काढलेला आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा काटा“, अशी फटकेबाजी रामदास आठवलेंनी केली. तर “तिकडे राहून काही उपयोग नव्हता. मी पूर्वी तिकडे होतो पण तिकडे राहून काही उपयोग नव्हता. नरेंद्र मोदींचं नेतृत्व विकासाच्या दिशेने पुढे जाणारं आहे. ज्यावेळेला मी येतो चंद्रपूरमध्ये, त्यावेळेला माझ्या आठवणीमध्ये येतं सफल झालेलं चंद्रयान, साऱ्या जगाचं असतं भारताकडे ध्यान. या देशाची 140 कोटी जनता आहे नरेंद्र मोदींची फॅन, या निवडणुकीत लावणार आहोत आम्ही इंडिया आघाडीवर बॅन“, अशी शेरोशायरी रामदास आठवलेंनी केली.

Published on: Apr 08, 2024 10:04 PM
वंचितकडून प्रकाश आंबेडकर अकोल्याचे उमेदवार, ‘या’ चिन्हावर लढणार लोकसभा
काँग्रेसने जाहीरनामा नव्हे तर माफिनामा प्रसिद्ध करायला हवा, मुख्यमंत्र्यांचा घणाघात