राज ठाकरे यांच्या युतीची आम्हाला गरज…, रामदास आठवले नेमकं काय म्हणाले?
VIDEO | मुंबईत सत्ता मिळवण्याऐवढी ताकज राज ठाकरे यांच्यात नाही, रामदास आठवले स्पष्टच म्हणाले आणि...
अहमदनगर : राज ठाकरे यांच्याशी भेटीगाठी होत असल्या तरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या युतीची आम्हाला आवश्यकता नाही, असे स्पष्टपणे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. यासह ते असेही म्हटले की, राज ठाकरे चांगले वक्ते आहेत. ते स्वतंत्र नेते असून त्यांच्या मोठाल्या सभा होतात मात्र त्यांना मतं मिळत नाही, अशी त्यांची परिस्थिती आहे. आम्ही तिघं एकत्रं असताना आम्हाला राज ठाकरे यांची गरज नाही त्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांचं राजकारण करावं, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी मुंबईत सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे. या दाव्याबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, मुंबईत त्यांची चार पाच जागा तरी निवडून आणाव्या, पण त्यांना फारसं यश मिळणार नाही आणि मुंबईत सत्ता मिळवणं ऐवढी ताकद राज ठाकरे यांच्यात नसल्याचे म्हणत रामदास कदम यांनी राज ठाकरे यांनी खोचक टोला लगावला.