अजितदादांच्या आईंची इच्छा होणार पूर्ण? आई तुमच्या देखतच अजित पवार मुख्यमंत्री, कुठं केली बॅनरबाजी?
'लोकांनाही वाटते अजित दादा मुख्यमंत्री व्हावे. माझ्या देखत दादाने राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, ही माझी सुद्धा इच्छा आहे.' असं अजितदादांच्या आईनं म्हटलं होतं. यानंतर पुण्यात सचिन खरात गटातर्फे आई तुमच्या देखतच अजितदादा मुख्यमंत्री होणार! या अशा आशयाचे बॅनर लावले
पुणे, ७ नोव्हेंबर २०२३ | रविवारी राज्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. यावेळी अजित पवार यांच्या गावात काटेवाडीत अजित पवार यांच्या आई आशाताई पवार यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान करून आल्यानंतर आशाताई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी माझ्या डोळ्यासमोर अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा बोलून दाखवली. पुढे त्या असंही म्हणाल्या की, बारामतीमध्ये लोकांचे भरभरून प्रेम मिळाले. बारामती मधील जनता आमच्या सोबत आहेत. लोकांनाही वाटते अजित दादा मुख्यमंत्री व्हावे. माझ्या देखत दादाने राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, ही माझी सुद्धा इच्छा आहे. यावरूनच पुण्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गटातर्फे आई तुमच्या देखतच अजितदादा मुख्यमंत्री होणार! या अशा आशयाचे बॅनर लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले.
Published on: Nov 07, 2023 06:39 PM