‘तर ‘रासप’चाच मुख्यमंत्री असणार’, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काय म्हणाले महादेव जानकर?

| Updated on: Aug 30, 2024 | 1:53 PM

ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करणार असल्याचे म्हटले. २९ सप्टेंबरपासून उपोषण करणार असून देवेंद्र फडणवीस यांच्यासह रावसाहेब दानवे यांच्या मुलालाही पराभूत करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. अशातच महादेव जानकर यांनी मोठं वक्तव्य केलंय.

महायुतीतून आणखी एक पक्षानं बाहेर पडण्याचे संकेत दिल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे सुतोवाच केलं आहे. आज रासपचा 21 वा वर्धापन दिन अकोला येथील मराठा मंडळ मंगल कार्यालयात संपन्न झाला. या कार्यक्रमात रासप पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणांमध्ये ‘एकला चलो रे’चा सूर आळवला आहे. दरम्यान यावेळी भाषणात बोलतांना महादेव जानकर यांनी देखील कार्यकर्त्यांची भूमिका उचलून धरत 288 जागांवर तयारी करण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. कार्यक्रमात बोलत असताना महादेव जानकर यांनी मोठं वक्तव्य केले आहे. जर आपले 10 आमदार आले तर रासप या पक्षाचाच मुख्यमंत्री असेल, असं महादेव जानकर आपल्या भाषणात म्हणालेत. यासह महादेव जानकर असेही म्हणाले, की मराठा समाजाचे 14 मुख्यमंत्री झाल्यानंतरही आरक्षणाची मागणी होतेय. ती का होतेय?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थितीत केला आहे.

Published on: Aug 30, 2024 01:53 PM
शिवरायांचा पुतळा कोसळला यात वैभव नाईकांचा हात? भाजप नेत्यांच्या ‘त्या’ ट्वीटनं खळबळ
ट्रायल घेण्यासाठी गेलेली बोट खोल समुद्रात बुडाली अन्…, बघा व्हिडीओ