सिल्वर ओकला वळसा? वर्षावर जानकरांचा जलसा, मविआच्या उंबऱ्यापर्यंत गेलेले जानकर महायुतीत

| Updated on: Mar 25, 2024 | 1:56 PM

महाविकास आघाडीशी जवळीक वाढलेली असताना रासपच्या महादेव जानकरांनी महायुतीतच थांबण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन जागांचा निर्णय घेणाऱ्या जानकरांनी आम्हाला एक जागा दिली जाणार असल्याचे म्हटलंय.

महाविकास आघाडीच्या दारापर्यंत गेलेले महादेव जानकर हे आता महायुतीकडून लढणार आहे. त्यांनी तशी अधिकृत घोषणाही केली आहे. महाविकास आघाडीशी जवळीक वाढलेली असताना रासपच्या महादेव जानकरांनी महायुतीतच थांबण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी दोन जागांचा निर्णय घेणाऱ्या जानकरांनी आम्हाला एक जागा दिली जाणार असल्याचे म्हटलंय. वर्षा या निवासस्थानी प्रसाद लाड हे महादेव जानकर यांनी घेऊन आलेत आणि आपण महायुतीसोबत असल्याचे जाहीर केले. दरम्यान, वर्षा या शासकीय निवासस्थानी आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. तसेच अजित पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित होते. या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाली. महादेव जानकर हे परभमी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

Published on: Mar 25, 2024 01:56 PM