विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS ने काय दिल्या सूचना?

| Updated on: Oct 11, 2024 | 4:20 PM

तिकीट देताना जुन्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष नको, असे म्हणत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपचे चांगलेच कान टोचले आहेत. काल झालेल्या बैठकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भारतीय जनता पक्षाला सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी आपली कंबर कसली आहे. अशातच काल भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएस यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत भाजपला महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्यात. जातीय समीकरण जुळवताना हिंदुत्वापासून दूर जाऊ नका, असे म्हणत संघाने थेट भाजपला सूचना दिल्याचे पाहायला मिळाले. इतकंच नाहीतर विधानसभेसाठी अधिक सक्रिय होऊन कामाला लागण्याच्या सूचनाही दिल्यात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जातीय समीकरण जुळवताना हिंदुत्वापासून दूर जाऊ नका. मताधिक्य असलेल्या बुथवर मतदानाचा टक्का वाढवा, ६० टक्क्यांच्या वर मतदान न्या…पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, लोकसभा निवडणुकीत गाफील राहिले आता विधानसभा निवडणुकीत सक्रिय व्हा… अशा प्रकारे भाजपला संघाकडून सल्ले देण्यात आले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे संगठन तयारीला लागले असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भाजपच्या तयारी आणि नियोजनाचा आढावा घेत आहे. यामध्ये काल नागपूर जिल्ह्यातील 12 मतदारसंघातील तयारी, नियोजन आणि कामांचा आढावा संघाकडून घेण्यात आला. बघा व्हिडीओ

Published on: Oct 11, 2024 03:57 PM