भाजप नेत्यांची वेगवेगळी विधानं अन् भाजपची कोंडी, संघानं बदलली भूमिका?
जात गणनेबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर मागास घटकांच्या विकासासाठी जातगणनेचा वापर व्हावा, अशी भूमिका मांडलीये. गेल्या दोन दिवसांपूर्वी संघांच्या विदर्भ प्रचारकांनी जात गणनेला विरोध केला होता. त्यावरून भाजपची कोंडी झाल्याने संघाने आपली भूमिका स्पष्ट
मुंबई, २२ डिसेंबर २०२३ : जात गणनेबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तर मागास घटकांच्या विकासासाठी जातगणनेचा वापर व्हावा, अशी भूमिका मांडलीये. गेल्या दोन दिवसांपूर्वी संघांच्या विदर्भ प्रचारकांनी जात गणनेला विरोध केला होता. त्यावरून भाजपची कोंडी झाल्याने संघाने आपली भूमिका स्पष्ट केल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवसांच्या फरकाने भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा सूर संघाच्या अधिकृत भूमिकेमुळे बदलल्याचे दिसतंय. दोन दिवसांपूर्वी सामाजिक समरसता टिकावी, म्हणून जातनिहाय गणनेला आमचा विरोध आहे, असे विदर्भ संघाचे प्रचारक श्रीधर गाडगे यांनी म्हटले. तर जातनिहाय गणनेचा उपयोग विविध मागास वर्गाच्या विकास आणि समृद्धीसाठी व्हावा, असे संघाचे अखिल भारत प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी म्हटले. दरम्यान, जातगणनेबाबत संघने आपली भूमिका स्पष्ट केली आहे पण भाजप नेत्यांची वेगवेगळी विधानं असल्याने चर्चांना उधाण आलंय.