RSS Mohan Bhagwat : त्यावेळी समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न, मोहन भागवत यांचे सरकारला खडेबोल
वर्षभरापासून मणिपूर शांतीची वाट पाहतंय, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलंय... लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना या प्रचारावेळी समाजात द्वेष निर्माण कऱण्याचा मोठा प्रयत्न झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीतही चुकीचा प्रचार केला गेला, मोहन भागवत म्हणाले.
वर्षभरापासून मणिपूर शांतीची वाट पाहतंय, असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. तर प्राथमिकता देऊन मणिपूरबाबत विचार करणं हे कर्तव्य असल्याचेही मोहन भागवत म्हणाले. असं वक्तव्य करत मोहन भागवत यांनी सरकारला एकप्रकारे चांगलेच खडेबोल सुनावले आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना या प्रचारावेळी समाजात द्वेष निर्माण कऱण्याचा मोठा प्रयत्न झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाबतीतही चुकीचा प्रचार केला गेला, मोहन भागवत म्हणाले. इतकंच नाहीतर ते पुढे असेही म्हणाले, सत्ताधारी आणि विरोधकांनी सहमतीच्या राजकारणावर लक्ष द्यावे, असा सल्लाही मोहन भागवत यांनी यावेळी दिल्याचे पाहायला मिळाले. बघा नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
Published on: Jun 11, 2024 05:46 PM