Rupali Chakankar | महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची उद्या जबाबदारी स्वीकारणार : रुपाली चाकणकर

| Updated on: Oct 20, 2021 | 7:53 PM

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. निवडीबाबतचं पत्र रुपाली चाकणकर यांना आज मिळालं. चाकणकर या अध्यक्षपदाची जबाबदारी उद्या स्वीकारणार आहेत. तशी माहिती त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिलीय.

राज्य महिला आयोगाला अखेर दीड वर्षानंतर अध्यक्ष मिळाला आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड करण्यात आली आहे. निवडीबाबतचं पत्र रुपाली चाकणकर यांना आज मिळालं. चाकणकर या अध्यक्षपदाची जबाबदारी उद्या स्वीकारणार आहेत. तशी माहिती त्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिलीय.

4 फेब्रुवारी 2020 रोजी विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा पासून हे पद रिक्त होतं. राज्यात गेल्या काही दिवसांत महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अशावेळी भाजप आणि अन्य विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला जात होता. महिला सुरक्षेबाबत हे सरकार गंभीर नसल्याचा आरोप केला जात होता. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त असल्यामुळे राज्य सरकारवर अनेकदा टीकास्त्र डागलं आहे. अशावेळी अखेर ठाकरे सरकारनं रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड केली आहे.

Shashikant Shinde | ईडी, आयटीच्या बापाला आम्ही घाबरत नाही, शशिकांत शिंदेंचा सोमय्यांवर हल्लाबोल
NCB Raid | अनन्या पांडेच्या घरातून ईलेक्ट्रॉनिक गॅझेट जप्त, शाहरुखच्या घरीही एनसीबीची झाडाझडती