Rupali Chakankar : … अन्यथा न्यायालयात जाणार, मीरा बोरवणकर यांनी अजितदादांवर केलेल्या आरोपांवरून रूपाली चाकणकर यांचा इशारा
VIDEO | मीरा बोरवणकर यांच्याकडून अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप, बोरवणकर यांनी केलेल्या दाव्यामुळे अजित पवार यांच्याबद्दल राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू आहे. तर मीरा बोरवणकरांचा बोलवता धनी कोण? असा सवाल अजित पवार गटाच्या रूपाली चाकणकरांनी केला उपस्थित
मुंबई, १६ ऑक्टोबर २०२३ | मीरा बोरवणकरांचा बोलवता धनी कोण? असा सवाल अजित पवार गटाच्या रूपाली चाकणकर यांनी सवाल उपस्थित केला आहे. तर पुरावे द्या, अन्यथा न्यायलयात जाणार असा इशारा देखील रूपाली चाकणकर यांनी माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांना दिला आहे. यावर बोलताना रूपाली चाकणकर म्हणाल्या, असे अनेक आरोप बरेच जण करतात मात्र पुरावे कोणाकडे नसतात. त्यामुळे मीरा बोरवणकर यांनी जे काही आरोप अजित पवार यांच्यावर केले आहेत. त्याचे पुरावे त्यांनी सादर करावे. आपल्याकडे पुरावे असेल तर बोलावं. गेल्या १२ वर्षांपूर्वीची गोष्ट ते आज बोलताय, त्यामुळे यामागे त्यांचा बोलवता धनी कोण? आहे हे पाहावं लागेल असं रूपाली चाकणकर म्हणाल्या.
Published on: Oct 16, 2023 11:56 PM