ताईंना दादांवर बोलायला वेळ पण…, रूपाली चाकणकर यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल?

| Updated on: Jul 30, 2024 | 5:55 PM

उरणमध्ये झालेल्या घटनेवर न बोलणाऱ्या ताईंना दादांवर बोलायला वेळ आहे, असं म्हणत रूपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका देखील केली आहे. सुप्रिया सुळे यांना विधानसभेचे वेध लागल्याने त्या हास्यास्पद विधानं करत असल्याचे म्हणत रूपाल चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे

सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले आहे, असं वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी करत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उरणमध्ये झालेल्या घटनेवर न बोलणाऱ्या ताईंना दादांवर बोलायला वेळ आहे, असं म्हणत रूपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका देखील केली आहे. सुप्रिया सुळे यांना विधानसभेचे वेध लागल्याने त्या हास्यास्पद विधानं करत असल्याचे म्हणत रूपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, उरणच्या पिडीतेवर चक्कार एकही शब्द न बोललेल्या सुप्रिया सुळे दररोज दादांवर अनेक विधानं करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे करत असतात. तर लोकसभेत त्यांचा सेट केलेला नरेटिव्ह आता धूऊन निघाला आहे. त्यांना विधानसभेचे वेध लागले आहेत. इतकंच नाहीतर त्यांना मुख्यमंत्रीपदाचे डोहाळे लागले आहेत, अशा पद्धतीचे विधानं करून माध्यमांसमोर जाण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असल्याचे रूपाली चाकणकर म्हणाल्या.

Published on: Jul 30, 2024 05:55 PM
या विद्वान बाईच्या धाकट्या मुलानं वाहिनीवर हात टाकला अन्… चित्रा वाघ यांची विद्या चव्हाणांवर आगपाखड
राज ठाकरेंवर टीका अन् कार्यकर्त्यांचा संताप अनावर; मिटकरींवर ॲसिड हल्ला अन् कारची तोडफोड