प्रविण दरेकरांनी महिलांची माफी मागावी, अन्यथा राष्ट्रवादी महिलांचा अपमान करणारांची थोबाडं रंगवू शकतं : रुपाली चाकणकर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या वक्तव्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष आहे, अशी टीका दरेकर यांनी केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या वक्तव्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचे मुके घेणारा पक्ष आहे, अशी टीका दरेकर यांनी केली होती. प्रविण दरेकर यांच्या बोलण्यावरुन त्यांच्या पक्षांची संस्कृती समजली आहे. प्रविण दरेकर यांनी महिलांची माफी मागावी, अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे. प्रविण दरेकर यांनी महिलांची माफी मागितली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस महिलांचा अपमान करणाऱ्यांचं थोबाड रंगवू शकतो याची जाणीव ठेवावी, असं आव्हान रुपाली चाकणकर यांनी दिलं आहे. तर, प्रविण दरेकर यांनी रुपाली चाकणकरांच्या आरोपांना महत्व देत नसल्याचं म्हटलं आहे. प्रविण दरेकर शिरुर येथील एका सभेत बोलत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं होतं.