सासरी नांदावं माहेरी लुडबूड…, नाव न घेता रूपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंना खोचक टोला

| Updated on: Mar 22, 2024 | 1:26 PM

अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांच्या प्रचाराच्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनीही हल्लाबोल केलाय. मात्र आपण कुणाचंही नाव घेतलं नसल्याचं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं.

मुलींनो सासरी नांदावं…सासरी लुडबूड करू नये, हे रूपाली चाकणकर यांचं वक्तव्य चर्चेत आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार यांच्या प्रचाराच्या वेळी त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनीही हल्लाबोल केलाय. मात्र आपण कुणाचंही नाव घेतलं नसल्याचं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं. दरम्यान रूपाली चाकणकर यांचा रोख सुप्रिया सुळे यांच्याकडे असल्याचं बोललं जात आहे. मात्र खुद्द महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडून असं वक्तव्य केले जात असल्याने त्यांच्यावर टीका होतेय. विशेष म्हणजे माहिरी कुणी नसल्यावर सासरी महिला कशा एकट्या पडतात, असे अनेक उदाहरणं रुपाली चाकणकर यांनी दिली होती. मात्र याच चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंबद्दल बोलताना सासर आणि माहेर असा भेद केला. एकीकडे राज्यसरकारने आपल्या नावात आईचं नाव लावणं बंधनकारक केलंय. सरकार हा निर्णय धाडसी असल्याचं सांगताय तर महिला अयोगाच्या अध्यक्षा सासरी लुडबूड करू नये, असं सांगताय, बघा स्पेशल रिपोर्ट

Published on: Mar 22, 2024 01:26 PM
मनसेची महायुतीत एंट्री पक्की, ‘शेपूट’वरुन ठाकरे आणि शिंदेंमध्ये जुंपली
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसची बँक खाती गोठवली, काय आहे प्रकरण?