रोहिणी खडसेंच्या वाहनावरील भ्याड हल्ल्याचा निषेध, पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करावी, रुपाली चाकणकरांची मागणी

| Updated on: Dec 28, 2021 | 12:19 PM

या हल्ल्याची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी गंभीर दखल घेली आहे. हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी चाकणकर यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुक्ताईनगरकडे येत असताना हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्या वाहनाची  किरकोळ तोडफोड झाली असून, रोहिणी खडसे यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. या हल्ल्याची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी गंभीर दखल घेली आहे. हल्लेखोरांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी चाकणकर यांनी केली.

Varsha Gaikwad | शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण
तेव्हा कुठे गेला होता तुझा राधासुता धर्म?, तर दोन हात करण्याची तयारी ठेवावी लागेल, भास्कर जाधव कडाडले