रुपाली पाटील यांचं निवडणूक आयोगाला पत्र, हेमंत रासने यांच्या ‘त्या’ कृतीमुळे आचारसंहितेचा भंग; कोणती केली मागणी?
VIDEO | भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्यावर कारवाई करा, रुपाली पाटील यांचं निवडणूक आयोगाला पत्र, बघा कोणती केली मागणी
पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचे मतदान आज होत आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्या कारवाई करा, अशी मागणी रुपाली पाटील ठोंबरे यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात केली आहे. आज पोटनिवडणूकीचे मतदान करताना हेमंत रासने यांनी आपल्या गळ्यात कमळ असं चिन्ह असलेलं गमछा (स्कार्फ) परिधान करून आले होते. ते गळ्यात असतानाच त्यांनी आपले मतदान केले. मात्र यावेळी तिथे उपस्थित असलेल्या कोणत्याही निवडणूक अधिकाऱ्याने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला नाही. याच मुद्द्यावरून रूपाली पाटील ठोंबरे यांनी ही कृती म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याचे म्हणत हेमंत रासने यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करणारं पत्र निवडणूक आयोगाला केले आहे.