मूळात बेकायदेशीर सरकारने आज मंत्रीपदाची शपथ घेतली – रुपाली ठोंबरे
"मूळात बेकायदेशीर सरकारने आज मंत्रीपदाची शपथ घेतली. रखडलेला पाळणा आज हलला. परंतु क्रांती दिवसाच्या दिवशी बेकायदेशीर सरकारने शपथ घेतली"
मुंबई: “मूळात बेकायदेशीर सरकारने आज मंत्रीपदाची शपथ घेतली. रखडलेला पाळणा आज हलला. परंतु क्रांती दिवसाच्या दिवशी बेकायदेशीर सरकारने शपथ घेतली. ही गोष्ट महाराष्ट्राच्या जनतेला रुचलेली नाही. त्यामुळे ही काळी नोंद आहे. महिलांचा आदर, सन्मान करण्याचा दिखावा करत होते. पण आज एकाही माता-भगिनीला मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही” अशी टीका रुपाली ठोंबरे यांनी केली.
Published on: Aug 09, 2022 03:55 PM