कसबा पेठ पोटनिवडणूक मतदानादरम्यान ‘त्या’ व्हायरल फोटोवर रूपाली ठोंबरे यांचं स्पष्टीकरण, म्हणाल्या…
VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात? 'मी गुन्हागारच नाही....', बघा काय म्हणाल्या?
पुणे : कसबा पोटनिवडणुकीत भाजपचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर निवडणूक मैदानात उतरले आहेत. तर, हिंदू महासंघाचे आनंद दवेही मैदानात आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याचे समोर आले आहे. रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक फोटो फेसबुक पेजवर टाकला आहे. त्या फोटोनंतर विरोधकांनी त्यांच्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. परंतु हा फोटो आपला नसून तो फोटो मला एक मतदाराने पाठवला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या वादामुळे आपण संध्याकाळी पाच वाजता मतदान करणार आहे, तोपर्यंत यंत्रणांनी शोध घ्यावा, असे आव्हान त्यांनी दिले आहे. बघा काय दिलं रुपाली पाटील ठोंबरे यांनी त्या व्हायरल फोटोवर स्पष्टीकरण…
Published on: Feb 26, 2023 04:43 PM