Mumbai Corona | मुंबईतल्या राजावाडी रुग्णालयाबाहेर लस घेण्यासाठी नागरिकांच्या रांगा
कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मागील काही महिन्यांपासून देशभरात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. पण अद्यापही लसीकरणाचा योग्य ताळमेळ बसला नसल्याने नागरिकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
देशभरात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. कोरोना महामारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मागील काही महिन्यांपासून देशभरात लसीकरणाला वेग आला आहे. विविध राज्यात लसीकरण सुरु असून अनेक रुग्णालयासह काही सार्वाजनिक ठिकाणांना लसीकरण केंद्र बनवण्यात आलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु असूनही अद्यापही लसीकरणाचा योग्य ताळमेळ बसला नसल्याने नागरिकांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
त्यात महाराष्ट्रात राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता लसीकरणासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात धडपड करत आहेत. त्यामुळे अनेक लसीकरण केंद्रावर गर्दी आणि लांबच लांब रांगा दिसून येत आहेत. मुंबईच्या घाटकोपर येथे लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याची दृश्य बुधवारी सकाळी दिसून आली.