बाँब हल्ल्यात युक्रेनमधील पाणीसाठे उद्धवस्त
रशियाकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांच्या माऱ्यामुळे नागरिकांसह युक्रेनचे प्रचंड नुकसान झाले आहे. रशियाच्या बाँब हल्ल्या युक्रेनमधील पाणी पुरवठा केंद्राचे मोठे नुकसान झाले आहे.
रशियाकडून करण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांच्या माऱ्यामुळे नागरिकांसह युक्रेनचे प्रचंड नुकसान झाले आहे. रशियाच्या बाँब हल्ल्या युक्रेनमधील पाणी पुरवठा केंद्राचे मोठे नुकसान झाले आहे. पाणी पुरवठा केंद्रे उद्धवस्त करण्यात आल्याने युक्रेनमधील अनेक शहरांतील नागरिक पाण्यासाठी तडफडत आहेत. पाण्याविना नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचे मत संयुक्त राष्ट्र संघाने व्यक्त केले आहे. पाण्यासाठी येथील नागरिक अक्षरशः तडफडत आहेत. त्यामुळे रशियाने क्षेपणास्त्रांचा मारा थांबवावा अशी मागणी अनेक राष्ट्रांनी केली आहे. पाणी साठेच नष्ठ झाल्यामुळे नागरिकांच्या समस्येत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. रशियाच्या बाँब हल्ल्यामुळे युक्रेनमधील असे अनेक पाण्याची केंद्र नष्ट झाली आहेत.