गेल्या दहा दिवसांत रशियाकडून युक्रेनवर पाचशेहुन अधिक मिसाईलचा मारा
रशिया आणि युक्रेन युद्धाचा आज दहावा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. गेल्या नऊ दिवकसांमध्ये रशियाने युक्रेनवर 500 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धाचा आज दहावा दिवस आहे. रशियाकडून युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. गेल्या नऊ दिवकसांमध्ये रशियाने युक्रेनवर 500 हून अधिक क्षेपणास्त्रे डागली आहेत. या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. शहरे उद्धवस्त झाली आहेत. प्रशासकीय इमरती ओस पडल्या आहेत. नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. आतापर्यंत जवळपास बारा लाख लोकांनी युक्रेन सोडल्याचा दावा संयुक्त राष्ट्र संघाकडून करण्यात आला आहे. प्रचंड प्रमाणात वित्त हानी देखील झाली आहे. आज सकाळी पुन्हा एकदा रशियाकडून युक्रेनवर मिसाई हल्ले करण्यात आले आहेत.