रशियाकडून युक्रेनवर हायपरसॉनिक मिसाईलचा हल्ला
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनचं मोठं नुकसान झालं आहे. प्रचंड प्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा रशियाकडून युक्रेनवर हायपरसॉनिक मिसाईलचा हल्ला करण्यात आला आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनचं मोठं नुकसान झालं आहे. प्रचंड प्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा रशियाकडून युक्रेनवर हायपरसॉनिक मिसाईलचा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत तीस लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी युद्धाच्या भीतीपोटी युक्रेन सोडून इतर देशात स्थलांतर केले आहे. तर दुसरीकडे रशियाने युद्धबंद करावे यासाठी अमेरिकेसह नोटोचे सदस्य असलेल्या युरोपीयन राष्ट्रांकडून रशियावर दबाव निर्माण केला जात आहे. दबाव असतानाही रशियाने युद्ध सुरूच ठेवले आहे.
Published on: Mar 20, 2022 11:34 AM