Special Report | पुतीन म्हणतात, मी ठरवणार युक्रेनी राष्ट्राध्यक्ष
रशियाने संपूर्ण देश ताब्यात घेण्यासाठी आता रशियन सैन्य साऱ्या युक्रेनमध्ये घुसले आहे. युक्रेनच्या चहूबाजूनी रशियाने आपले घुसवले असून 65 किमी सैनिकांचा ताफा थांबवून ठेवण्यात आला आहे. हे सगळे एका माणसासाठी करण्यात येत आहे तो माणूस म्हणजे यानाकोविच अर्थात पुतीन समर्थक.
रशियाने संपूर्ण देश ताब्यात घेण्यासाठी आता रशियन सैन्य साऱ्या युक्रेनमध्ये घुसले आहे. युक्रेनच्या चहूबाजूनी रशियाने आपले घुसवले असून 65 किमी सैनिकांचा ताफा थांबवून ठेवण्यात आला आहे. हे सगळे एका माणसासाठी करण्यात येत आहे तो माणूस म्हणजे यानाकोविच अर्थात पुतीन समर्थक. युक्रेन ताब्यात घेऊन पुतीन यांना युक्रेनची सत्ता आता त्यांच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न सुरु आहे. 2014 मध्ये हेच यानाकोविच राष्ट्रध्यक्ष होते आणि तेव्हा सुद्धा ते पुतीनचे हस्तक म्हणूनच ओळखले जात होते. त्यामुळे आता रशिया युक्रेनमध्ये चारी बाजूने सैन्य का घुसवत आहे त्यासाठी हे राजकीय आखाडेही बांधण्यात येत आहेत. जर भविष्यात यानाकोविच यांना राष्ट्राध्यक्ष बनवण्यात आलेच तर युक्रेनियन नागरिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून आतापासूनच युक्रेनमध्ये सैन्य घुसवून युक्रेनियन नागरिकांची मुसकटदाबी करण्याचा प्रयत्न पुतीनकडून चालवला जात आहे.