Special Report | युद्धाच्या आगीत रशियाच भाजणार?
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा अकरावा दिवस आहे. सध्या तरी या युद्धात रशियाचे पारडे जड दिसत आहे. मात्र रशियाने युद्ध बंद करावे यासाठी अमेरिकेसह युरोपीयन देशांकडून दबाव वाढत आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा अकरावा दिवस आहे. सध्या तरी या युद्धात रशियाचे पारडे जड दिसत आहे. मात्र रशियाने युद्ध बंद करावे यासाठी अमेरिकेसह युरोपीयन देशांकडून दबाव वाढत आहे. मात्र तरी देखील रशिया युद्धातून माघार घेण्यास तयार नाही. त्यामुळे आता अनेक देशांनी रशियावर कडक आर्थिक निर्बंध टाकले आहेत. या आर्थिक निर्बंधाचा मोठा फटका हा रशियाला बसू शकतो. आर्थिक निर्बंधांमुळे रशियाचे चलन घसरले आहेत. तसेच अनेक वस्तुंचा देशात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रशिया अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे रशिया हा कच्च्या तेलाचा सर्वात मोठा निर्यातदार देश असल्यामुळे येणाऱ्या काळात जागतिक स्थरावर कच्च्या तेलाचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.