रशियन सैनिकांची कीवकडे वाटचाल
गुरुवारी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी आदेश दिल्यानंतर रशियन सैनिकांनी युक्रेनवर हल्ला केला. गेल्या तीन दिवसांपासून युद्ध सुरू आहे. आता रशियन सैनिकांनी युक्रेनची राजधानी कीवकडे कूच केली आहे.
गुरुवारी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी आदेश दिल्यानंतर रशियन सैनिकांनी युक्रेनवर हल्ला केला. गेल्या तीन दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात रशियाची सरशी होताना दिसत आहे. रशियन सैनिकांनी केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान आता रशियन सैनिकांनी युक्रेनची राजधानी कीवकडे वाटचाल केली असून, कीव काबीज करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आज सकाळी पुन्हा एकदा युक्रेनवर हल्ला करण्यात आला.