रशियन हेलिकॉप्टरचा ताफा कीवच्या हवाई हद्दीत शिरला
कीव शहरावर संकट
Image Credit source: Tv9 Marathi

रशियन हेलिकॉप्टरचा ताफा कीवच्या हवाई हद्दीत शिरला

| Updated on: Mar 02, 2022 | 8:27 PM

रशियन हेलिकॉप्टरचा ताफा कीवच्या हवाई हद्दीत शिरला असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं कीववर रशियाकडून मोठा हल्ला केला जाण्याची शक्यता वर्तवली जातीय. नागरिकांना सतर्कतेसाठी अलर्ट करण्यात आलं आहे.

रशियानं यूक्रेनवर आक्रमण केलंय त्याला आता 7 दिवस पूर्ण होत आलेले आहेत. कीव हे राजधानीचं शहर अद्याप रशियाच्या पूर्णपणे ताब्यात आलेलं नाही. कीव अद्यापही ताब्यात येत नसल्यानं रशिया अस्वस्थ आहे. रशिया आज कीव शहरावर मोठ्या प्रमाणात हल्ला करु शकतं. याशिवाय खारकीव शहरावरही रशियाला कब्जा मिळवायचा असल्यानं खारकीवमध्ये मोठे हल्ले रशियन फौजांकडून केला जाण्याची शक्यता आहे. रशियन हेलिकॉप्टरचा ताफा कीवच्या हवाई हद्दीत शिरला असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळं कीववर रशियाकडून मोठा हल्ला केला जाण्याची शक्यता वर्तवली जातीय. नागरिकांना सतर्कतेसाठी अलर्ट करण्यात आलं आहे.

रशियाचा आज रात्री खारकीववर ताबा घेण्याचा प्रयत्न
Special Report | चीनचा रशियाला पाठिंबा, नव्या मैत्रीचा नजराणा? -Tv9