यूक्रेनचं शिष्टमंडळ बेलारुसमध्ये चर्चेसाठी पोहोचलं, रशियन माध्यमांचा दावा
रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यूक्रेननं सुरुवातीला रशियानं बेलारुसमध्ये चर्चा करण्याचा प्रस्ताव नाकारला होता.
रशिया आणि यूक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यूक्रेननं सुरुवातीला रशियानं बेलारुसमध्ये चर्चा करण्याचा प्रस्ताव नाकारला होता. रशियानं तीन तासांचा अल्टिमेटम दिल्यानंतर यूक्रेननं चर्चेचा प्रस्ताव स्वीकारला असल्याची माहिती आहे. बेलारुसच्या राष्ट्रपतींनी यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेंस्की यांच्यात चर्चा झाली आहे. यूक्रेनचं पथक चर्चेसाठी बेलारुसमध्ये पोहोचल्याचं वृत्त रशियन माध्यमांनी दिलं आहे.