रशियन फौजा Ukraine मध्ये कुठे-कुठे घुसल्या? | Russia Ukraine Conflict

| Updated on: Feb 27, 2022 | 4:30 PM

सध्या जगभर चर्चा आहे ती फक्त आणि फक्त रशिया-युक्रेन युद्धाची (Russia Ukraine War). हे युद्ध थांबले पाहिजे असे सर्वांनाच वाटत आहे. यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (Zelenskyy) यांनी म्हटले आहे की त्यांचा देश रशियासोबत शांतता चर्चा करण्यास तयार आहे.

सध्या जगभर चर्चा आहे ती फक्त आणि फक्त रशिया-युक्रेन युद्धाची (Russia Ukraine War). हे युद्ध थांबले पाहिजे असे सर्वांनाच वाटत आहे. यावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की (Zelenskyy) यांनी म्हटले आहे की त्यांचा देश रशियासोबत शांतता चर्चा करण्यास तयार आहे. पण ही चर्चा बेलारूसमध्ये (Belarus) होणार नाही. सुरू असलेल्या हल्ल्यासाठी बेलारूस ग्राउंड सपोर्ट करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी रविवारी एका व्हिडिओ संदेशात वॉर्सा, ब्रातिस्लाव्हा, इस्तंबूल, बुडापेस्ट किंवा बाकू यांचे चर्चेची पर्यायी जागा म्हणून नाव दिले. ते म्हणाले की चर्चा इतर ठिकाणी देखील होऊ शकते, परंतु युक्रेन बेलारूसमध्ये चर्चा करणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे रशिया आता आणकी कठोर भूमिका घेण्याची शक्यता आहे. खरं तर, क्रेमलिनने रविवारी सांगितले की त्यांचे एक शिष्टमंडळ युक्रेनियन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी बेलारशियन शहर गोमेल येथे पोहोचले आहे.

Published on: Feb 27, 2022 04:30 PM