Saamana : तुमची ही ‘सत्तेची वारी’ शेवटचीच… ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेवरून सामनातून दादांवर निशाणा

| Updated on: Jul 01, 2024 | 1:21 PM

'बारामतीत बहिणीविरोधात जाणाऱ्या भावाला लाडक्या बहिणींची चिंता आहे, असं म्हणत सामनातून अजित पवार यांच्यावर ही खोचक टीका करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे असणाऱ्या योजना मिंधे गटाच्या आहेत. त्यांची ही प्रसिद्धी सुरू आहे तर तुमची ही 'सत्तेची वारी' शेवटचीच आहे'

सामना या वृत्तपत्रातील अग्रलेखातून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या सरकारच्या योजनेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. बारामतीत बहिणीविरोधात जाणाऱ्या भावाला लाडक्या बहिणींची चिंता आहे, असं म्हणत सामनातून अजित पवार यांच्यावर ही खोचक टीका करण्यात आली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे असणाऱ्या योजना मिंधे गटाच्या आहेत. त्यांची ही प्रसिद्धी सुरू आहे तर तुमची ही ‘सत्तेची वारी’ शेवटचीच आहे, असे म्हणत महायुती सरकारवरच हल्लाबोल केलाय. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही योजना आकर्षक असली तरी असंख्य अटी-शर्तीचा गुंता राज्यातील लाखो भगिनी कसा सोडवू शकतील? हा प्रश्न आहे. पुन्हा महागाईचा वणवा तुम्हीच पेटविला आहे त्यामुळे तुमची ही जेमतेम दीड हजाराची ‘फुंकर’ भगिनींना कितपत दिलासा देईल? हाही प्रश्न आहेच. या प्रश्नांची उत्तरे द्यायची सोडून सत्तेतील घटक पक्ष श्रेय घेत स्वतःची छाती पिटत आहेत. अर्थसंकल्पातील योजनांच्या श्रेयाची कितीही वाटमारी करा, तुमची ही ‘सत्तेची वारी’ शेवटचीच आहे.’, असे सामनातून म्हटले आहे.

Published on: Jul 01, 2024 01:21 PM
थेट भर रस्त्यावरच महाकाय मगरीचा ‘कॅटवॉक’, नागरिकांमध्ये एकच खळबळ, बघा थरारक व्हिडीओ
विवाह सोहळ्यानंतर कुटुंबातील 17 जण पिकनीकला, भावाचा फोन आला, घाबरतच म्हणाला, मुलगी वाहून गेली आणि…