Saamana on Modi Oath as PM : थोडे थांबायला हवे, देशात नकारात्मक ऊर्जेचे तिसरे पर्व…, ‘सामना’तून मोदींच्या शपथविधीवर निशाणा

| Updated on: Jun 10, 2024 | 12:04 PM

दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. नरेंद्र मोदी यांच्यासह तब्बल ७२ नेत्यांनी शपथ घेतली. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या याच भव्य दिव्य आणि दिमाखदार शपथविधीवर सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका करण्यात आली आहे.

नुकतीच नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. दिल्ली येथील राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी यांच्यासह तब्बल ७२ नेत्यांनी शपथ घेतली. दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या याच भव्य दिव्य आणि दिमाखदार शपथविधीवर सामनाच्या अग्रलेखातून सडकून टीका करण्यात आली आहे. देशात नकारात्मक ऊर्जेचे तिसरे पर्व सुरू झाले. तर मोदी यांनी देशात नकारात्म ऊर्जा निर्माण केली, असा घणाघातही सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. ‘मोदी यांनी देशात नकारात्मक ऊर्जा निर्माण केली. कारण ते स्वतः त्याच विचारांचे आहेत. मोदी-शहा यांनी सत्तेचा वापर देशातील आनंद, उत्साह, विकास मारण्यासाठी केला. लोकांना मूर्ख, अंधभक्त बनवून राज्य करणे व त्यासाठी टाळया-थाळया वाजवणे हे नकारात्मकतेचे लक्षण आहे. कर भला तो हो भला, ही मोदींची वृत्ती नाही. म्हणूनच नितीश कुमार व चंद्राबाबू हे मोदींच्या सहवासात आले तरी त्यांना मोदींचे भय वाटत आहे. कामाख्या देवीस रेडयाचा बळी दिला जातो तसा आपला बळी जाईल काय? या भयाने सगळेच पछाडले आहेत. कारण देशात नकारात्मक ऊर्जेचे तिसरे पर्व सुरू झाले. ग्रहण लागल्यावर जी उदासीनता येते तसेच वातावरण आहे. थोडे थांबायला हवे.’, असे सामनातून म्हटले आहे.

Published on: Jun 10, 2024 12:04 PM
Modi 3.0 Cabinet : पंतप्रधान मोदींचं 3.O कॅबिनेट कसं असणार? कोणत्या दिग्गजांनी घेतली शपथ?
Mumbai Weather Update : मुंबईकरांनो काळजी घ्या… आज रात्री मुसळधार पाऊस; IMD कडून मोठी माहिती, कोणता दिला अलर्ट?