Saamana : मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची चावी मोदी यांच्या खिशात पण…, जरांगे पाटील यांच्या उपोषणावर सामनातून काय निशाणा?

| Updated on: Nov 03, 2023 | 10:47 AM

मराठा आरक्षणाचा पेच हा महाराष्ट्राच्या गळ्याला लागलेला फास आहे. एरवी महाराष्ट्राच्या राजकारणात हस्तक्षेप करणारे भाजपचे दिल्लीश्वर आता पळ काढीत आहेत. जरांगे पाटलांचे उपोषण थांबले हे बरे झाले. मराठयांना आरक्षण कसे मिळणार हा पेच मात्र कायम आहे, सामनातून काय साधला निशाणा?

मुंबई, ३ नोव्हेंबर २०२३ | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीला धडक दिली पाहिजे, असे सामनातून म्हटले आहे. तर मराठा आरक्षणाच्या प्रश्नाची चावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खिशात आहे. पण मोदी गांभीर्याने पाह नसल्याचेही सामनातून म्हटले आहे. ‘मराठा आरक्षणाचा पेच हा महाराष्ट्राच्या गळ्याला लागलेला फास आहे. एरवी महाराष्ट्राच्या राजकारणात हस्तक्षेप करणारे भाजपचे दिल्लीश्वर आता पळ काढीत आहेत. 2 जानेवारीनंतर मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे ही जरांगे पाटलांची मागणी आता मान्य झाली आहे. कुणबी प्रमाणपत्र म्हणजे आरक्षण नाही. जरांगे पाटलांचे उपोषण थांबले हे बरे झाले. मराठयांना आरक्षण कसे मिळणार हा पेच मात्र कायम आहे.’ असे सामनातून म्हटले आहे. तर फडणवीस म्हणाले मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवा म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यापासून फडणवीस स्वतःला लांब ठेवत आहेत? असा सवालही उपस्थित केला आहे.

Published on: Nov 03, 2023 10:47 AM