मुंबईच्या शिवाजी पार्कात होणार रमाकांत आचरेकर यांचं स्मारक, कुणी केली मागणी?

| Updated on: Aug 12, 2023 | 7:15 PM

VIDEO | मुंबई येथील शिवाजी पार्क येथे मास्टरब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांचे कोच रमाकांत आचरेकर यांचे स्मारक करण्याची मागणी, कुणी केली रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाची मागणी?

मुंबई, १२ ऑगस्ट २०२३ | मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कमध्ये भारतरत्न सचिन तेंडूलकर यांचे कोच रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाची मागणी होत असल्याचे समोर येत आहे. ज्या शिवाजी पार्कात अनेक दिगग्ज क्रिकेटर ज्यांच्या हाताखाली घडले, असे कोच रमाकांत आचरेक यांचं स्मारक व्हावे अशी मागणी क्रिकेट प्रेमी सुनील रामचंद्रन यांनी केली आहे. मुंबई महानगर पालिकेच्या जी उत्तर विभाग आयुक्तांना स्मरकासंदर्भात पत्र देखील देण्यात आले आहे. रमाकांत आचरेकर यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर, कसोटीवीर प्रवीण आम्रे, विनोद कांबळी, चंद्रकांत पंडित, लालचंद राजपूत, संजय बांगर, रमेश पोवार, पारस म्हाम्बरे, समीर दिघे अशी जागतिक कीर्तीचे क्रिकेटर घडवले आहेत. ज्या पार्कात त्यांनी हे क्रिकेटर्स घडवले, त्या पार्कात स्मारक व्हावं अशी मागणी क्रिकेट प्रेमी सुनील रामचंद्रन यांनी केली आहे.

Published on: Aug 12, 2023 07:15 PM
विदेश दौऱ्यावरून मुंबईत येताच उद्योगमंत्र्यांकडून गुडन्यूज, तब्बल ‘इतक्या’ हजार कोटींची आणली गुंतवणूक
पुण्यात मोठ्या राजकीय हालचाली, शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गुप्त बैठक?