सचिन तेंडुलकरने लतादीदींना वाहिली श्रद्धांजली
लतादीदींच्या जाण्याने देशाचा सूर हरपला आहे. सारा देश हळहळ व्यक्त करत आहे. लतादीदींवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील उपस्थिती होती. दीदींना निरोप देण्यासाठी अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.
लतादीदींच्या जाण्याने देशाचा सूर हरपला आहे. सारा देश हळहळ व्यक्त करत आहे. लतादीदींवर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील उपस्थिती होती. दीदींना निरोप देण्यासाठी अनेक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे असे मोठे नेतेही उपस्थित होते. तसेच चित्रपट सुष्टीतील अनेक कलाकार देखील लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते. दरम्यान सचिन तेंडुलकर देखील लतादीदींच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते. त्यांनी लतादीदींना श्रद्धांजली वाहिली.