Sada Sarvankar : राज ठाकरे यांचं टेन्शन वाढलं, सदा सरवणकर यांची माघार नाहीच, म्हणाले….

| Updated on: Nov 04, 2024 | 3:27 PM

विधानसभा निवडणुकांचे येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या निवडणुकीत अनेक ठिकाणी नेत्यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली. तर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने बंडखोरी रोखण्यात महायुती, मविआला यश येत की ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Follow us on

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माहीममधून अमित ठाकरे हे निवडणूक लढवणार असून त्यांच्यासमोर शिवसेना ठाकरे गटाचे महेश सावंत आणि शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांचे आव्हान आहे. अमित ठाकरेंच्या विजयाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी सदा सरवणकरांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी दबाव टाकला जात असून मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी त्यांची मनधरणी केली मात्र विधानसभा लढवण्यावर सदा सरवणकर हे ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून आज तरी सदा सरवणकर हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार की नाही? याकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. मात्र आज सदा सरवणकरांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली. ‘मनसेने महायुतीविरोधातील सर्व उमेदवार मागे घ्यावे, मग मी माघार घेईन’, अशी एकच अट सरवणकरांनी माहीममधून माघार घेण्यासाठी मनसेपुढे ठेवली. तर येणाऱ्या निवडणुकीत मनसेमुळे महायुतीला फटका बसणार आहे, असेही सरवणकर म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले, ‘ही निवडणूक माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी, माझ्यासाठी लढवत नाही. गेली अनेक वर्ष जे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत, ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत, अनेक संकटात, कठीण परिस्थितीत ते माझ्यासोबत ठामपणे उभे आहेत. त्यांच्याशी आणि मतदारसंघातील जनतेशी बोलणार, त्यांची भावना जाणून घेऊन मगच मी माझा निर्णय घेणार आहे.’