Sadabhau Khot | साखर कारखानदार, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करु नये : सदाभाऊ खोत
केंद्र सरकारने कुठलाही वेगळा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कुणीही फसवणूक करू नये, अशी टीका माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली.
मुंबई : राज्यात उसाचा गाळप हंगाम सध्या सुरू होत आहे. गाळप हंगाम तोंडावर असतानाच राज्यातल्या काही शेतकरी संघटना केंद्र सरकारबाबत आरोप करून FRP चे खापर फोडत आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. मात्र याबाबत केंद्र सरकारने कुठलाही वेगळा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कुणीही फसवणूक करू नये, अशी टीका माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केली. याबाबत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट आज खोत यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी नवी दिल्लीत ही प्रतिक्रिया दिली आहे.