Sadabhau Khot : सदाभाऊ खोतांनी थ्री स्टार हॉटेलमध्ये कार्यकर्त्यांसोबत चटणी भाकरीवर ताव हाणला! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

| Updated on: Jun 17, 2022 | 8:42 PM

आता सदाभाऊंचा अजून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात सदाभाऊ एका थ्री स्टार हॉटेलमध्ये (Three Star Hotel) कार्यकर्त्याच्या शिदोरीवर ताव हाणताना दिसत आहेत.

सोलापूर : रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. सदाभाऊ सांगोला दौऱ्यावर असताना एका हॉटेल चालकाने त्यांचा ताफा अडवला आणि 2014 मध्ये कार्यकर्त्यांनी केलेल्या जेवणाचं बिल न दिल्याचा आरोप केला. त्यावेळी वेळ मारुन नेणाऱ्या सदाभाऊंनी नंतर तो हॉटेल चालक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता (NCP Party Worker) असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. त्यानंतर आता सदाभाऊंचा अजून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात सदाभाऊ एका थ्री स्टार हॉटेलमध्ये (Three Star Hotel) कार्यकर्त्याच्या शिदोरीवर ताव हाणताना दिसत आहेत.

सदाभाऊ खोत शुक्रवारी सकाळी सोलापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी एका थ्री स्टार हॉटेला न्याहरीसाठी थांबले. तिथे सदाभाऊंनी आपल्या कार्यकर्त्याने आणलेल्या घरच्या शिदोरीवर ताव हाणला. घरची ज्वारीची भाकरी, शेंगाती चटणी आणि हिरव्या मिरचीच्या ठेच्याचा मनस्वी आस्वाद त्यांनी घेतला. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि पत्रकार उपस्थित होते. सदाभाऊंची थ्री स्टार हॉटेलमधील पदार्थ न घेता कार्यकर्त्याच्या डब्यात न्याहरी केल्यानं सोशल मीडियावर त्यांचं कौतुक होत आहे. दरम्यान, उधारीनाट्याच्या व्हिडीओनंतर सदाभाऊंचा हा व्हिडीओ समोर आल्यानं सोशल मीडियावर अनेक चर्चाही झडत आहेत.

सदाभाऊंचा राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप

दरम्यान, सदाभाऊंचा सांगोल्यातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केला होता. सदाभाऊ खोत यांनी तो हॉटेलचालक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचा आरोप केलाय. मुळात त्या माणसाला मी ओळखत नाही. 2014 च्या निवडणुकीत तुमच्या हॉटेलमध्ये कोण लोक जेवायला आले होते, त्याची यादी द्या. किती लोक होते, हे तो दाखवत नाही. हा माणूस राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. ते काळे झेंडे आणि निदर्शनं करणार होते. पण माझा ताफा लवकर आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्यामुळे त्यांचं इतर नियोजन बारगळलं. 2014 पासून आतापर्यंत मी सांगोला तालुक्यात, परिसरात 50 वेळा आलो आहे. ज्या माणसाला मी ओळखत नाही, माझा मुलगा ओळखत नाही, ज्या माणसाकडे पुरावा काही नाही.  हा काय प्रकार आहे, 10 – 10 वर्षे तो का गप्प होता? हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे आणि याच्यामागे राष्ट्रवादीच्या नेत्याचा हात आहे, असा आरोप खोत यांनी केलाय.

Published on: Jun 17, 2022 08:42 PM
Abhijit Bichukale on President Election | अभिजीत बिचुकले राष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार?
Special Report | 13 अपक्ष आमदार ठरवणार कोण जिंकणार?-tv9