Sadabhau Khot : ‘रक्त सांडले जिथे मी…’, सदाभाऊ खोत यांच्याकडून फडणवीसांचं तोंडभरून कौतुक अन् केली कविता

| Updated on: Dec 04, 2024 | 12:36 PM

'आज खऱ्या अर्थाने बहुजन समाजाचा एक नेता जननायक या राज्याच्या सिंहासनावर अश्वारूढ होण्यासाठी आज सज्ज झाला आहे. त्या देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आमच्या मनात प्रचंड आदर, स्वाभिमान आहे. निश्चितपणे राज्याला पुढे घेऊन जाण्याची क्षमता देवेंद्र फडणवीस यांच्यात'

‘रक्त सांडले जिथे मी, रणांगणी सरदार होतो. त्याच कारणी मी सिंहासनाचा मी हकदार होतो’, असं म्हणत सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर लहानशी कविता केल्याचे पाहायला मिळाले. सदाभाऊ खोत पुढे असेही म्हणाले की, आज खऱ्या अर्थाने बहुजन समाजाचा एक नेता जननायक या राज्याच्या सिंहासनावर अश्वारूढ होण्यासाठी आज सज्ज झाला आहे. त्या देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल आमच्या मनात प्रचंड आदर, स्वाभिमान आहे. निश्चितपणे राज्याला पुढे घेऊन जाण्याची क्षमता देवेंद्र फडणवीस यांच्यात असल्याचा विश्वास सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेतील. स्वकीय, परकीय यासांरख्या अनेक संकटावर या व्यक्तिमत्त्वाने जनतेच्या आशीर्वादाने मात केली आहे. तर कोणाची नाराजी आहे, यासंदर्भात महाराष्ट्राच्या जनतेला काही देणं-घेणं नाही. तर राज्यातील जनतेला फक्त देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा आहे, असेही सदाभाऊ खोत म्हणाले. दरम्यान,पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

Published on: Dec 04, 2024 12:36 PM